Pimpri News: पंजाबमध्ये आम आदमीची सत्ता; शहर आम आदमी पार्टीचा जल्लोष

एमपीसी न्यूज – आम आदमी पार्टीची पंजाब राज्यात एकहाती सत्ता आली आहे. दिल्लीबाहेर आम आदमी पाय पसरले आहेत. पंजाब मधील विजयाचा पिंपरी-चिंचवड शहर आम आदमी पार्टीने जल्लोष केला.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटून मोठा जल्लोष केला.

आम आदमी पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष चेतन  बेंद्रे म्हणाले, “आम आदमी पार्टीचा विजय हा सर्वसामान्यांचा विजय आहे. अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली मॉडेल चा विजय आहे.  आपच्या उमेदवारांनी पंजाब आणि गोवामध्ये बड्या बड्या प्रस्थापित नेत्यांना पराभूत करून देशात सर्व सर्वसामान्यांचा विकासाचा पायंडा रचला आहे.
आम आदमी पार्टी आता देशात प्रमुख विरोधी पक्ष आणि भाजप ला टक्कर देणारा पक्ष म्हणून समोर आला आहे. आम आदमी पार्टीच्या या विजयाने येणाऱ्या काळात जातीधर्माच्या मुद्द्यावरून शिक्षण, आरोग्यासारख्या  मूलभूत मुद्द्यावर लढल्या जातील”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.