Pune News : भाजप नगरसेवक धनराज घोगरेवर आणखी एक गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धनराज घोगरे यांच्यासह सात जणांवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. नगरसेवक धनराज घोगरे आणि त्यांच्या साथीदारांनी तक्रारदाराला ऑफिसमध्ये बोलावून त्याचे अपहरण केले आणि एफिडेविटवर सह्या घेत जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात सादर करण्याचा प्रयत्न केला. 

या प्रकरणी नगरसेवक धनराज घोगरे यांच्यासह विनोद माने पाटील, सदा ढावरे सुरेश तेलंग एडवोकेट अतुल पाटील, यांच्यासह एकूण सात जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल दिवसे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे ठेकेदार आहेत. नगरसेवक घोगरे यांनी काम मिळवून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेतले होते. त्यानंतर त्यांना कामही दिले नाही. फिर्यादी पैसे मागण्यासाठी गेले असता त्यांना मारहाण केली. फिर्यादी यांनी याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार घोगरे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी घोगरे यांनी तक्रारदाराचे अपहरण केले आणि जबरदस्तीने त्यांच्या सह्या घेऊन ते एफिडेविट न्यायालयात सादर करण्याचा प्रयत्न केला. इतर आरोपी पैकी एक असलेल्या सदा ढावरे यांनी वानवडी दिलेल्या तक्रारी बाबत बोलायचे म्हणून फिर्यादीला पर्वती दर्शन येथील घराजवळ बोलावले.

नंतर त्याला धमकी देऊन त्यांचे अपहरण केले. नंतर जबरदस्तीने त्यांच्या सह्या घेत ते एफिडेविट न्यायालयात सादर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दत्तवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.