Talegaon Dabhade News : विशाल वाळुंज यांची फलटण तालुका काँग्रेस निरीक्षकपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज – काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. विशाल सतीश वाळुंज यांची काँग्रेस पक्षाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा पृथ्वीराज चव्हाण व सातारा जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

वाळुंज यांनी तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळ सभापतीपद भूषविले आहे. तसेच तळेगाव शहर युवक काँग्रेसचे अध्यक्षपद ही त्यांच्याकडेच असून सध्या ते पुणे जिल्हा काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष पद सांभाळत आहेत. त्यांच्या निवडीचे पक्षाकडून स्वागत करण्यात आले.

Talegaon Dabhade News : शहरात सुरू असलेली प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा; भाजपची मागणी

काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष सांस्कृतिक विभाग प्रमुख विशाल वाळुंज यांची सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यासंर्भात जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे एक आढावा बैठक कराड येथे पार पडली. काँग्रेस पक्षाच्या या आढावा बैठकीत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव,सातारा जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण तसेच महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस उदय सिंह पाटील असे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.