Talegaon Dabhade News : शहरात सुरू असलेली प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा; भाजपची मागणी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरात सुरू असलेली विविध प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, अशी मागणी तळेगाव दाभाडे भाजपच्या वतीने नगरपरिषदेकडे करण्यात आली. रस्ते, गटार अशी कामे तात्काळ पूर्ण करावीत. कामात दिरंगाई केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे. मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष रविंद्र माने, नगरसेविका शोभा भेगडे, सरचिटणीस शोभा परदेशी, भाजपा नेते दिपक भेगडे, विनायक अभ्यंकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष निर्मल ओसवाल, सोशल मिडीया अध्यक्ष उपेंद्र खोल्लम, अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष सुनिल कांबळे, कामगार आघाडी सदस्य आतीष रावळे, बाळासाहेब जाधव हे उपस्थित होते.

Akash Shinde : एमपीएससीमधून सहाय्यक प्रकल्प अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल आकाश शिंदे यांचा नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी तर्फे सत्कार

तळेगाव दाभाडे शहरातील प्रलंबित व कूर्मगतीने चाललेली रस्त्यांची कामे पावसाळ्याआधी तातडीने पूर्ण करावीत.त्यामध्ये विशेषतः शाळा चौक- गणपती चौक ते घोरावाडी स्टेशन रस्ता, भेगडे आळी परिसर-चांभार वाडा-सुतारवाडा-कुंभारवाडा- श्रीडोळसनाथ मंदिर-कैकाडी आळी परिसर-रमाकांत नगर-चावडी चौक दाभाडे आळी-काका हलवाई ते हिंदमाता भुयारी मार्ग-लक्ष्यद्विप सोसायटी या भागातील भुयारी गटार योजना व पाणी योजना पूर्ण करुन व पूर्ण असल्यास सर्व रस्ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची आग्रही मागणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यामध्ये दिरंगाई झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

या भेटीमध्ये ओबीसी आरक्षण इम्पेरिकल डाटा कार्य माहिती, इतर प्रलंबित विषयांवर चांगली चर्चा झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.