Akash Shinde : एमपीएससीमधून सहाय्यक प्रकल्प अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल आकाश शिंदे यांचा नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी तर्फे सत्कार

एमपीसी न्यूज – नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून ‘सहाय्यक प्रकल्प अधिकारी’ म्हणून निवड झालेले आकाश दिलीप शिंदे यांचा सत्कार नूतन परिवारातर्फे करण्यात आला. आकाश शिंदे हे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे, नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरींग या विभागातून उत्तीर्ण झाले आहेत.

सत्काराला उत्तर देताना आकाश शिंदे म्हणाले, “अथक परिश्रमाचे फळ मला मिळाले, या यशात महाविद्यालयाचे सहकार्य मौल्यवान आहे. तसेच मावळ भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यासाठी मी नेहमी तत्पर राहील असे आश्वासन त्यांनी दिले.

UPSC CDS Exam : यूपीएससीच्या सीडीएस परीक्षेत वडगावच्या आदित्य गायकवाड याने मिळवला देशात 20 वा रॅंक

या प्रसंगी संस्थचे खजिनदार राजेश म्हस्के यांनी आकाशचे हे यश आमच्या संस्थेसाठी अभिमानाची बाब असून त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. संस्थचे अध्यक्ष  संजय ( बाळा) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी आकाशचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा, सर्व विभागप्रमुख आणि शिक्षक शिक्षकेतर  वर्ग उपस्थित होता. प्रा. नीता कराडकर यांनी सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.