Uma Khapre : भाजपकडून विधानपरिषदेसाठी महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना संधी

एमपीसी न्यूज – विधानपरिषेद निवडणुकीसाठी भाजपने महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे (Uma Khapre) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

HSC Result 2022 Update : बारावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींचीच बाजी

उमा खापरे (Uma Khapre) या पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन वेळा भाजपाच्या नगरसेविका होत्या. 2001-02 मध्ये त्या महाहापालिकेत विरोधीपक्ष नेत्या होत्या. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अत्यंत निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. प्रदेश भाजपा कार्यकारणीत गेली 20 वर्षे त्या विविध पदांवर कार्यरत आहेत. सध्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. आता विधानपरिषदेसाठी त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे शहराला चौथा आणि शहर भाजपला तिसरा आमदार मिळणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.