HSC Result 2022 Update : बारावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींचीच बाजी

12 वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर... वाचा सविस्तर बातमी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल (HSC Result 2022) आज (दि.08 जून) जाहीर करण्यात आला असून बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 94.22 टक्के इतका लागला आहे. राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांचे एमपीसी न्यूज कडून खूप अभिनंदन. 

दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा ‘कोकणची पोरं हुशार’ हे ब्रीद कायम ठेवत कोकण विभागाने 97.21 टक्के मिळवत सगळ्यांमध्ये बाजी मारली आहे, त्यानंतर नागपूर विभागाने सुद्धा 96.52 टक्के मिळवत चांगली बाजी मारली आहे.  दरम्यान मुंबईची यंदा 90.91 इतकीच टक्केवारी आल्याने मुंबईचे टक्केवारीचे स्थान इतर विभागांपेक्षा घसरल्याचे पाहायला मिळत आहे. बारावी परीक्षा 2021 या वर्षीचा एकूण निकाल 94.22 टक्के एवढा लागला आहे.

HSC Result 2022 : बारावीचा आज निकाल होणार जाहीर; विद्यार्थी, पालकांची उत्सुकता शिगेला

पाहुया कोणत्या विभागाला किती टक्केवारी (HSC Result 2022) –

  • कोकण विभाग: 97.21
  • पुणे: 93.61
  • नागपूर: 96.52
  • औरंगाबाद : 94.97
  • मुंबई : 90.91
  • कोल्हापूर: 95.07
  • अमरावती: 96.34
  • नाशिक: 95.03
  • लातूर: 95.25
  • एकूण: 94.22

90 टक्के वरती गुण मिळाले विद्यार्थी

पुणे: 1721

नागपूर: 1046

मुंबई: 2766

कोल्हापूर: 593

अमरावती: 1783

नाशिक: 612

लातूर: 563

कोकण: 138

4 मार्चपासून सुरु झालेल्या बारावीच्या परीक्षेला राज्यात एकूण 14,85,826 इतके विद्यार्थी बसले होते. बारावी परीक्षा 4 मार्च 2022 ते 30 मार्च 2022 या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.

पुढील साइटवर तुम्ही आपला निकाल पाहू शकता – 

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

mahresult.nic.in

बारावीचा निकाल कसा तपासायचा? (HSC Result 2022)

  1. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जा – mahresult.nic.in.
  2. मुख्यपृष्ठावरील नवीनतम घोषणा विभाग तपासा.
  3. HSC निकाल 2022 (कला, विज्ञान किंवा वाणिज्य) साठी लिंक निवडा आणि त्यावर क्लिक करा.
  4. लॉगिन विंडोमध्ये परीक्षेचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करा.
  5. तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  6. तसेच, भविष्यातील संदर्भासाठी महाराष्ट्र 12वी परीक्षेच्या निकालाची प्रिंटआउट डाउनलोड करा आणि घ्या.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्याप्रमाणे आज दुपारी 1 वाजता mahahsscboard.in  या संकेतस्थळावर निकाल जाहीर होईल. त्यानंतर लवकरच महाराष्ट्र 12 वी टॉपर्स 2022 ची घोषणा केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.