HSC Result 2022 : बारावीचा आज निकाल होणार जाहीर; विद्यार्थी, पालकांची उत्सुकता शिगेला

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा आज (दि. 08 जून) निकाल (HSC Result 2022) जाहीर होणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून आज काय निकाल लागणार याबाबतची विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे. 

बारावीचे विद्यार्थ्यी निकाल कधी लागणार म्हणून वाट पाहत होते. दरम्यान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत निकालबाबत (HSC Result 2022) माहिती दिली आणि विद्यार्थ्यांची प्रतिक्षा अखेर संपली. आज बारावीचा निकाल जाहीर होणार असून असून दुपारी एक वाजल्यानंतर बोर्डाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. यंदाच्या वर्षी 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

यावेळी बारावी परीक्षेलाच उशीर झाल्याने परीक्षेच्या निकालास (HSC Result 2022) सुद्धा उशीर झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना संकट ओसरले तरीही परीक्षेचे स्वरूप कसे असावे याबाबत उलटसूलट चर्चांना त्यावेळी चांगलेच उधाण आले होते, मात्र मंडळाकडून जाहीर केल्याप्रमाणे यंदा परीक्षेचे स्वरूप ऑफलाईन ठेवण्यात आले होते.

Todays Horoscope 08 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्याप्रमाणे आज दुपारी 1 वाजता mahahsscboard.in  या संकेतस्थळावर निकाल जाहीर होईल. त्यानंतर लवकरच महाराष्ट्र 12 वी टॉपर्स 2022 ची घोषणा केली जाणार आहे.

पुढील साइटवर तुम्ही आपला निकाल पाहू शकता – 

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

mahresult.nic.in

बारावीचा निकाल कसा तपासायचा? (HSC Result 2022)

  1. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जा – mahresult.nic.in.
  2. मुख्यपृष्ठावरील नवीनतम घोषणा विभाग तपासा.
  3. HSC निकाल 2022 (कला, विज्ञान किंवा वाणिज्य) साठी लिंक निवडा आणि त्यावर क्लिक करा.
  4. लॉगिन विंडोमध्ये परीक्षेचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करा.
  5. तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  6. तसेच, भविष्यातील संदर्भासाठी महाराष्ट्र 12वी परीक्षेच्या निकालाची प्रिंटआउट डाउनलोड करा आणि घ्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.