Chakan Crime News : सराईत गुन्हेगार समजून भावावर गोळीबार करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – रिक्षाचा कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादात सराईत गुंडाने मध्यस्थी करून धमकावले. त्याचा बदला घेण्यासाठी सराईत गुन्हेगार समजून त्याच्या भावावर पाच जणांनी मिळून गोळीबार केला. ही घटना 2 जून रोजी रात्री साडेअकरा वाजता महाळुंगे इंगळे येथे घडली. त्यातील दोघांना अटक करण्यात आली
आहे.

राहुल बाबासाहेब फलके (वय 28, रा. महाळुंगे, ता. खेड), अंकित अर्जुन थोरात (वय 28, रा. चाडोली बुद्रुक, ता. आंबेगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वैभव अरुण गायकवाड यांनी याप्रकरणी महाळुंगे चौकीत दिलेली फिर्यादीवरून पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Uma Khapre : भाजपकडून विधानपरिषदेसाठी महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना संधी

1 जून रोजी सायंकाळी महाळुंगे येथील सराईत गुंड अजय अरुण गायकवाड याचा मित्र संभाजी मोहन यमुनवाड याने विरुद्ध पार्टीचा सदस्य सोन्या जावळे याच्या ड्रायव्हरला रिक्षाचा कट मारल्यावरून वाद घालून सोन्या जावळे आणि राहुल फलके यांना मारहाण केली. त्यामुळे राहुल फलके याने त्याच्या मित्रांसह अजय गायकवाड याला अद्दल घडवण्याचे ठरवले.

2 जून रोजी रात्री साडेअकरा वाजता गुंड अजय गायकवाड हा वापरत असलेल्या कार मधून त्याचा भाऊ वैभव गायकवाड हा घरी जात होता. राहुल फलके आणि त्याच्या साथीदारांनी वैभव याला अजय समजून त्याच्यावर गोळीबार केला. त्यावेळी कारच्या मागून येत असलेल्या संभाजी यमुनवाड याने ‘वैभ्या पळ’ असा आवाज दिला. त्यामुळे हल्लेखोर घाबरून आपण ज्याच्यावर गोळीबार केला आहे, तो अजय गायकवाड नसल्याचे समजल्याने कार मधून पळून गेले.

या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर महाळुंगे पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार केली. उपनिरीक्षक विलास गोसावी आणि त्यांच्या पथकाने खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथून राहुल आणि अंकित या दोघांना ताब्यात घेतले आहे. अन्य तिघांचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त सागर कवडे, अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस अंमलदार गोरक थेऊरकर, राजू कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, युवराज बिराजदार, तानाजी गाडे, किशोर सांगळे, संतोष काळे, शिवाजी लोखंडे, शरद खैरे, बाळकृष्ण पाटोळे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.