Pune : कोंढव्यातील दुर्घटनेप्रकरणी दोघांना अटक; आठ जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कोंढवा येथील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बिल्डर अगरवाल याच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले सर्व अल्कॉन लँडमार्कस् रजिस्टर संस्थेचे भागीदार व कांचन रजिस्टर संस्थेचे भागीदार आहेत. तर विपुल आणि विवेक अगरवाल यांना अटक करण्यात आली आहे.  

जगदीशप्रसाद तिलकचंद अगरवाल (वय 64), सचिन अगरवाल (वय 34), राजेश अगरवाल (वय 27), विवेक सुनील अगरवाल(वय 21) विपुल सुनील अगरवाल (वय 21) पंकज व्होरा, सुरेश शहा रश्मिकांत गांधी यांच्यासह साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर, लेबर कॉन्ट्रॅक्टर व आणखी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढव्यामधील सोमजी पेट्रोल पंपाजवळ इमारतीच्या पार्किंगची भिंत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. मृतांमध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे. मृतांचा आकडा 18  पर्यंत जाऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. बांधकाम मजुरांसाठी तात्युरत्या स्वरूपात बांधलेल्या पत्र्याच्या खोल्यांवर ही भिंत कोसळली. अजूनही काही लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असून घटनास्थळी एनडीआरएफचे पथक, पुणे अग्निशमन दलाचे जवान आहेत. मदतकार्य अजूनही सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.