-MPC-TOP-MOST-BANNER-I

Article by Harshal Alpe : नियती पुढे आणि क्रिकेट पुढे सर्व समान!

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – सिडनी मैदानात झालेल्या भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघादरम्यानच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी आपली सगळी दुुखणी खुपणी बाजूला सारत उत्तम कामगिरी बजावली. याच विषयावरील हर्षल अल्पे यांचा आजचा लेख….


अखेर सिडनी टेस्ट भारताने अनिर्णित राखली, होय हे भारताचे यश आहे….

धडपडत, पडून पुन्हा उठत जखमांवर मात करत भारतीय जांबाज खेळाडू फक्त लढत होते, आणि ऑस्ट्रेलियाला जेरीस आणत होते, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू आणि प्रेक्षकांनी सुद्धा सर्व हातखंडे, जुमले सर्व काही वापरले अगदी त्यांच्याच भात्यातील अत्यंत घातक आणि अत्यंत वाईट अशी शेरेबाजी ही त्यांनी करुन पाहिली…. पण त्याने आपला भारतीय संघ तुटायच्या ऐवजी बॉलीवूड फेम सिनेमातल्या नायकासारखा शेवटी तुफान लढत राहिला आणि अपेक्षित नसला तरी शेवट आनंदाकडे घेऊन गेला, शेवटी सगळेच खूश…….

खरं तर या सगळ्यामध्ये एका गोष्टीचा प्रचंड विजय झाला आहे आणि तो कसोटी क्रिकेटचा आहे. पाच संपूर्ण दिवस हा खेळ चालला हे आजच्या काळात विशेषच म्हटले पाहिजे, ज्यात शेवटच्या दिवशीचा थरार काही वेगळाच होता, प्रत्येक षटक हा थरार अजूनच वाढवत होते…. पंत आणि पुजारा होते, तो पर्यंत आपण जिंकतोय असं आपल्याला वाटत होतं, तर एका क्षणात या दोघांच्या विकेटनंतर ऑस्ट्रेलियाला विजयाची स्वप्न भरदिवसा पडायला लागली, त्यांचा तर स्वीट डिशचा मेन्यू पण ठरला, त्यात हनुमा विहारीचा पाय दुखत असल्याने रन्स काही वेळ होणं बंद झालं, पण! अश्विन आणि विहारी यांनी त्यांच्या अक्कल हुशारीचा वापर चाणाक्षपणे केला, आपली विकेट सांभाळली, बस्स!

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

वेळेचा सदुपयोग करावा तो आपल्या लोकांनीच, बघा तुम्ही, विहारी धावू शकत नाही, काही हरकत नाही, विहारीने फास्ट बॉलरला टोलवावा, म्हणजे खेळून काढावा आणि लॉयनला अश्विनने सांभाळावा, असे ठरले आणि कित्येक षटके हे असेच चालले होते, त्यात रूपकात्मक म्हणजे अश्विनने छातीला लावलेले पॅड काढून विहारीकडे लॉयनला खेळताना देणे आणि त्यात जर एखादी रन आलीच तर स्वत: हातात घेऊन उभे राहाणे एवढाच उद्योग होता…. ऑस्ट्रेलिया मात्र या सगळ्यात वैतागत होती, अधिकच निराश होत होती…

गोलंदाज सारखे बदलले जात होते, हेतू एवढाच की, आपल्या कर्णधाराच्या नावाप्रमाणे “पेन” द्यायला बघत होती तर हनुमा विहारी आणि अश्विन हे आपल्या कर्णधाराच्या नावाप्रमाणे अजिंक्य राहाणेच पसंत करत होते….

… आणि इथेच हा खेळ जिंकला आणि रोमहर्षक जाहला……

लेखक : हर्षल आल्पे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.