worldcup 2023 : भारतीय क्रिकेट संघाचे पुणे विमानतळावर जल्लोषात स्वागत

एमपीसी न्यूज – काल विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानचा ( worldcup 2023 ) पराभव केल्यानंतर टीम इंडिया आज थेट पुण्यात दाखल झाली असून पुणे विमानतळावर चाहत्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

19 ऑक्टोबरला भारताचा पुढचा सामना बांगलादेश सोबत पुण्यातील गहूंजे स्टेडियमवर होत आहे. या सामन्यासाठी संपूर्ण भारतीय टीम आजच सहकुटुंब पुण्यात पोहोचली आहे.

Vadgaon : सोसायटी मध्ये आलेल्या घोरपडीला जीवनदान

पुढील चार दिवस भारताचा संघ पुण्यात मुक्कामी ( worldcup 2023 )असणार आहे. विश्वचषक 2023 मधील 17 वा सामना आणि भारताचा चौथा सामना बांगलादेश विरुद्ध होणार आहे. हा सामना गुरुवारी दुपारी 2.00 वाजता पुण्यातील गहूंजे स्टेडियमवर खेळला जाणार असून या सामन्यासाठी बाग्लादेशचा संघ कालच पुण्यात दाखल झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.