Vadgaon : सोसायटी मध्ये आलेल्या घोरपडीला जीवनदान

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील निसर्ग वाटिका (Vadgaon) सोसायटीमध्ये एक घोरपड आढळली. तिला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले. तसेच सोसायटी मधील नागरिकांना घोरपड आणि इतर वन्य प्राण्यांविषयी माहिती दिली.

रविवारी (दि. 15) वडगाव मावळ येथील निसर्ग वाटिका (Vadgaon)सोसायटीमध्ये घोरपड आल्याची माहिती नितीन भोकसे यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य जिगर सोलंकी यांना दिली. यानंतर जिगर सोलंकी आणि रोहित पवार यांनी तात्काळ निसर्ग वाटिका सोसायटीकडे धाव घेतली. सोसायटीच्या पेऱ्याखाली घोरपड बसली होती.

Mahalunge : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी

तिला सुरक्षितपणे पकडून तिची प्राथमिक तपासणी करण्यात आली. घोरपडीला कोणतीही इजा झाली नसल्याने वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली घोरपडीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

त्यानंतर जिगर सोलंकी व रोहित पवार यांनी निसर्ग वाटिका सोसायटीमधील नागरिकांना घोरपड विषयी माहिती दिली. कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास नजीकच्या प्राणिमित्र अथवा वनविभागाला (1926) माहिती देण्याचे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.