Mahalunge : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव आलेल्या एका वाहनाने दुचाकीला पाठीमागून (Mahalunge) धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सह प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता इंडोरंस चौक, महाळुंगे येथे घडली.

विशाल नारायण पवार (वय 35, रा. द्वारका सिटी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. समाधान माणिक पांडुरंग यादव (वय 33, रा. आंबेठाण चौक, चाकण) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : एम ए रंगूनवाला दंतवैद्यकीय महाविद्यालयात दंत आरोग्य दिन साजरा; दातांच्या आरोग्याबाबत जनजागृतीसाठी उपक्रम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यादव हे त्यांचा (Mahalunge) मित्र विशाल पवार यांच्यासोबत दुचाकीवरून (एमएच 11/0495) ड्यूरॅक्ट ट्युनी कंपनीतून प्रियंका एंटरप्रायजेस या कंपनीत जात होते. ते इंडोरंस चौक येथे आले असता त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव आलेल्या एका वाहनाने जोरात धडक दिली. यामध्ये विशाल पवार यांना गंभीर दुखापत झाली असून त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर फिर्यादी यादव यांना गंभीर दुखापत झाली आहे.

अपघात झाल्यानंतर आरोपी वाहन चालक घटनास्थळी न थांबता जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता तसेच पोलिसांना माहिती न देता पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.