Bhosari : पुरुष विभागात भैरवनाथ क्रीडा संस्था व महिला विभागात कला क्रीडा विकास प्रकल्प अजिंक्य

एमपीसी न्यूज : पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भैरवनाथ कबड्डी संस्था (Bhosari) आयोजित मारुती लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर सुरू असलेल्या पुणे जिल्हा (पिंपरी चिंचवड विभाग) अजिक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात भोसरीच्या भैरवनाथ क्रीडा संस्था व महिला विभागात कला क्रीडा विकास प्रकल्प कबड्डी संघ अजिंक्य ठरले.

पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड विभाग निर्माण झाल्यानंतर होत असलेल्या पुरुष विभागात भैरवनाथ क्रीडा संस्था अ संघाने जुन्नरच्या अतुलदादा बेनके कबड्डी संघावर ४१-२३ अशी मात करीत स्पर्धेतील अजिंक्यपद जिंकले. मध्यंतराला भैरवनाथ संघाकडे २४-१३ अशी आघाडी होती. ही आघाडी कायम राखत भैरवनाथ संघाने विजय मिळविला.

Chikhali : कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून पावणे सात लाखांचे साहित्य चोरीला

भैरवनाथ संघाच्या सुनिल सिध्दगवळी व रोहित पारटे यांनी चौफेर (Bhosari)चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्तपुर्ण भूमिका बजावली. तर विराज लांडगे व निखिल धावडे याने सुरेख पकडी घेतल्या. अतुलदादा बेनके संघाच्या गोकुळ तोडकर व अभिमन्यू गावडे यांनी चांगला प्रतिकार करीत जोरजदार टक्कर देण्याचा प्रयत्न केला. तर पवन कारंडे यांनी चांगल्या पकडी घेतल्या. या सामन्यात भैरवनाथ संघाने तीन लोन लावत सहा गुण मिळविले व एक बोनस गुण घेतला. तर अतुलदादा बेनके संघाने एक अव्वल पकडी सह ६ बोनस गुण मिळविले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.