Chikhali : कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून पावणे सात लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून अज्ञात ( Chikhali ) चोरट्यांनी कंपनीमधून सहा लाख 76 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना 13 ऑक्टोबर रोजी सकाळी सोनवणे वस्ती, चिखली येथील ड्राईव्ह गेअर पावर ट्रान्समिशन या कंपनीत उघडकीस आली.

प्रवीण शंकरराव ढाणे (वय 53, रा. चिखली प्राधिकरण) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vadgaon : ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे कातवी येथील सेवा रस्त्याचे काम पूर्ण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ढाणे यांची (Chikhali) सोनवणे वस्ती, चिखली येथे ड्राईव्ह गेअर पावर ट्रान्समिशन नावाची कंपनी आहे. 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार ते 13 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून कंपनीत प्रवेश केला. कंपनीमधून गेअर बॉक्स, इनव्हर्टर, स्टील बार, इलेक्ट्रिक मोटार, गेअर फोर्जिंग असे एकूण सहा लाख 76 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.