Vadgaon : ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे कातवी येथील सेवा रस्त्याचे काम पूर्ण

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसी रोडवरून कातवी गावाकडे (Vadgaon) जाणारा रस्ता अपघात प्रवण झाला होता. याबाबत ग्रामस्थांकडून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. कातवी ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आले असून एमआयडीसी कडून या सेवा रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

तळेगाव एमआयडीसी रस्त्यावरून कातवी गावाकडे जाणारा सेवा (Vadgaon) रस्ता अतिशय खराब झाला होता. अपघाताचे प्रमाण खूप वाढले होते. सहा महिन्यापूर्वी एमआयडीसी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी कातवी गावातील ग्रामस्थ तसेच मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष वैभव पिंपळे, कातवी गाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रामदास चव्हाण,युवा नेते रवींद्र चव्हाण, नवनाथ चव्हाण,अजिंक्य चव्हाण यांनी रस्ता त्वरित चांगला व्हावा यासाठी चांगलाच पाठपुरावा केला होता. त्यामुळे दि. 10 जून 2023 रोजी एमआयडीसीचे अधिकारी गावात आले होते. त्यांनी रस्त्याचा सर्वे सुद्धा केला.

Pimpri : दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन
त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते कैलास चव्हाण,स्वप्निल चव्हाण,दत्ता पिंपळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांना येत्या आठ दहा दिवसात रस्त्याचे काम सुरू करणार असल्याचे एमआयडीसी अधिका-यांनी त्यावेळी आश्वासित केले होते.

मात्र पावसाळ्याच्या कालावधीत रस्त्याचे काम करण्यास अडचणी आल्या. त्यामुळे काम होऊ शकले नव्हते. सहा महिन्यापूर्वी गावातील मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष वैभव पिंपळे,कातवी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रामदास चव्हाण,युवा नेते रवींद्र चव्हाण, नवनाथ चव्हाण,अजिंक्य चव्हाण,किशोर चव्हाण,अविनाश चव्हाण,गुलाब चव्हाण आणि ग्रामस्थांकडून याकामी झालेल्या पाठपुराव्यामुळे त्या अधिका-यांनी लागलीच दखल घेवून तातडीने सेवा रस्त्याचे काम पूर्ण केले.त्यामुळे कातवी गावातील ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.