Pune : अंघोळीची गोळी संस्थेचा एफसी रोडवर खिळेमुक्त झाडं उपक्रम

एमपीसी न्यूज – अंघोळीची गोळी संस्थेने पुणे महापालिका (Pune)आणि कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या सहकार्याने पुणे शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रोडवर खिळेमुक्त झाडं हा उप्रकम राबवला.

अंघोळीची गोळी संस्थेच्या माध्यमातून खिळेमुक्त झाड आणि आळेयुक्त झाड अशी संकल्पना राज्यभर राबवली जात आहे. हवामान बदलासाठी पर्यावरण संवर्धन हे एकच उत्तर असल्याने संस्थेचे सभासद सातत्याने हे उपक्रम राबवत आहेत.

Chakan : भागीदारांच्या आर्थिक त्रासाला कंटाळून संचालकाची आत्महत्या

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज परिसरातील झाडांवरील खिळे, बॅनर, पोस्टर काढण्यात आले. झाडांनाही (Pune)संवेदना असतात. तेही सजीव आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न झाला. संस्थेचे कार्यकर्ते तेजश्री पाटील, अनुराधा ठाकुर, संस्कृती रासकर, आप्पा घोरपडे, शरद बोदगे, अमित निखार, संदीप काळे, धनंजय ठाकरे, उमेश कामटेवाड, हम्पी बोदगे, कमिन्स इंडिया फाउंडेशनचे सुरेश गोडांबे, राजेंद्र वाघ तसेच महापालिकेचे सागर मोरे, विशाल बेलदरे, नवनाथ कदम, दशरथ टिळेकर यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

हवामान बदल हा सध्या सुरु असलेला ज्वलंत (Pune) विषय आहे. मानवाचे अस्तित्व यावर अवलंबून आहे. वृक्ष संवर्धन हेच हवामान बदलास सर्वात चांगले उत्तर आहे. त्यामुळे खिळेमुक्त झाडं हा उपक्रम सर्वांनी आपल्या शहरांत राबवावा, असे आवाहन अंघोळीची गोळी संस्थेचे अविनाश पाटील यांनी केले. पुण्याच्या माधव पाटील या तरूणाने सुरु केलेली खिळेमुक्त झाडं मोहीम विस्तारण्यासाठी अनेक युवक प्रयत्न करत आहे. पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत अनेक सामाजिक संस्थांची मदत या युवकांना मिळत आहे.

या मोहिमेत युवकांनी प्रामुख्याने झाडांना खिळेमुक्त, पोस्टरमुक्त, बॅनरमुक्त करण्याचा प्रयत्न केला. पर्यावरण संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम आणि राष्ट्रीय ग्रीन ट्रिब्युनल यांत झाडांसंदर्भात अनेक कायदे आणि नियम स्पष्टपणे अधोरेखित असले तरी आपल्याकडे ते पाळले जात नाही. त्यामुळे हे नियम अधिक प्रभावी कसे होतील यांसाठी आमचा प्रयत्न सुरु असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.