Pune News : रस्त्यात धिंगाणा घालताना अडवलं म्हणून तरुणाने धरली पोलिसाचीच गचांडी

एमपीसी न्यूज : रस्त्याच्या मध्यभागी दुचाकी आडवी लावून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना आडवून शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला रोखण्यासाठी पोलिस गेले असता या तरुणाने पोलिसांचीच गचांडी धरून त्यांना शिवीगाळ केली. कोंढव्यातील स्मशानभूमीजवळील सार्वजनिक रस्त्यावर हा प्रकार घडला. 

सुरज विजय घोडके (वय 24, रा. काळेवाडी, मूळ महाराणा प्रताप नगर म्हाडा कॉलनी लातूर ) असे या तरुणाचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार कुंडलिक प्रल्हाद गवळी (वय 50) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे कोंढवा वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री ते कोंढवा येथील स्मशानभूमीजवळ सार्वजनिक रस्त्यावर वाहतूक नियमन करीत होते. यावेळी आरोपीने रस्त्याच्या मध्यभागी दुचाकी आडवी लावून येणार्‍या-जाणार्‍या लोकांना शिवीगाळ करत होता. फिर्यादी आणि त्याच्या सोबत असणारे अन्य एका कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्याला गाडी रोडच्या बाजूला घेण्यासाठी सांगितले.

परंतु आरोपीने पोलिसांचे न ऐकता त्यांचीच गचांडी पकडून त्यांच्या शर्ट चे बटन तोडून ढकलून देत शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.