Pune News : राज ठाकरे पुण्यातून जाताच नेत्यांची अरेरावी, पक्ष कार्यालयातच घातला गोंधळ

एमपीसी न्यूज : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौर्‍यावर होते. या दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीत चर्चा केली. त्यानंतर राज ठाकरे अचानक मुंबईला निघून गेले. राज ठाकरे निघून जातात मनसेच्या पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयात मंगळवारी रात्री कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकळ यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. 

आपल्याला कुठल्याच बैठकांना का बोलावले जात नाही याचा जाब शैलेश विटकर यांनी भर बैठकीत विचारला. त्यानंतर रणजित शिरोळे संतापले आणि या दोघांमध्ये पक्ष कार्यालयातच मनसेच्या सर्व पदाधिकारी समोर वादाची ठिणगी पडली.

याविषयी आम्ही शैलेश विटकर यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले, गेली अनेक वर्षापासून मी पक्षात काम करतोय. भारतीय विद्यार्थी सेनेपासून मी पक्षात आहे. मला बैठकीत का बोलावले जात नाही इतकाच जाब विचारला होता. त्यानंतर शिरोळे यांनी माझ्यावर हात उचलला. परंतु ज्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या दाधिकार्‍यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.