Akurdi : आकुर्डीत पीसीपीची जनजागृती मॅरेथॉन रॅली

एमपीसी न्यूज  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड तंत्र निकेतनच्या (पीसीपी) वतीने पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आकुर्डी प्राधिकरण परिसरातून तीन कि.मी.ची मिनी मॅरेथॉंन व प्रचार फेरी काढण्यात आली.

पीसीपीच्या प्रवेशव्दारापासून प्राचार्या व्ही.एस.बॅकोड यांनी झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात झाली. प्रा. मनोज वाखारे यांनी आयोजन केलेल्या फेरीमध्ये सर्व विभाग प्रमुख विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सहभाग घेतला होता. रॅलीतील विद्यार्थ्यांनी बिग इंडिया चौक, मूक बधिर स्कूल, स्वप्नपूर्ती रोड येथे नदी प्रदूषण, प्लास्टिक कॅरीबॅग, वृक्षारोपण विषयी जनजागृती करणारे फलक दर्शविले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.