Pune : कसबा मतदारसंघात काँग्रेसमध्ये गटबाजी ; आमचं पण ठरलंय म्हणत झळकले फ्लेक्स

एमपीसी न्यूज – पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काँगेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना उमेदवारी जाहीर होताच कसबा पेठ मतदारसंघात गटबाजी उफाळून आली आहे. या मतदारसंघात काँग्रेसचाच दुसरा नगरसेवक इच्छुक आहे. त्याला स्थानिक नगरसेवकाचा विरोध असल्याचे समजते. ‘आमचं पण ठरलंय, कसबा विधानसभा मतदारसंघात बाहेरचा उमेदवार नको’ अशा आशयाचे फ्लेक्स झळकले आहेत

दुसरीकडे भाजपमध्येही इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यांनाही स्थानिकच उमेदवार हवा, त्यामुळे हे फ्लेक्स भाजप की काँग्रेसच्या इच्छुकांनी लावले ? याबाबत अधिकृत माहिती समजू शकली नाही. 4 ऑक्टोबर विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. तरीही काँगेस – राष्ट्रवादी, भाजप – शिवसेना, मनसेचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीची सुट्टी आहे. त्यामुळे 3 आणि 4 ऑक्टोबर ला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे. उमेदवारांना प्रचारासाठी केवळ 15 दिवसांचा कालावधी मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.