Balbharti : बालभारती नियामक मंडळाची बैठक; पाठ्यपुस्तकांमध्ये होणार बदल

एमपीसी न्यूज : मराठी भाषा विभागाने देवनागरी लिपीत (Balbharti) प्रमाणित मराठी अक्षरे आणि अंक स्वीकारण्याचा सरकारचा निर्णय नुकताच जाहीर केला. या शासन निर्णयानुसार पाठ्यपुस्तकात बदल करणे आवश्यक आहे. विशेषत: शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे असल्याने बालभारती याबाबत काय निर्णय घेणार, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

शासनाच्या निर्णयानुसार पाठ्यपुस्तकांतील बदलांबाबतचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. “देवनागरी लिपीत प्रमाणित मराठी अक्षरे आणि अंकांचा अवलंब करण्याचा निर्णय 2009 मध्ये घेण्यात आला होता. मात्र, त्या निर्णयाला त्यावेळी बालभारतीने विरोध केला होता. आता 2009 च्या शासन निर्णयात काही बदल करून नवीन शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

त्यात मराठी देवनागरीच्या लिपीत ‘ल’ आणि स्टेम्ड ‘श’ लिहिण्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या निर्णयाबाबत शिक्षण क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे संभ्रम वाढण्याची मानसिकता व्यक्त केली जात आहे. राज्यात बालभारतीतर्फे शालेय शिक्षणाची पुस्तके प्रकाशित होत असल्याने या शासन निर्णयानुसार पाठ्यपुस्तकांमध्ये करण्यात येणारे बदल बालभारती मान्य करणार का, त्यात बदल करणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यासंदर्भात बालभारतीचे (Balbharti) संचालक कृष्णकुमार पाटील यांना विचारले असता, नवीन शासन निर्णयानंतर पाठ्यपुस्तकांमध्ये तातडीने बदल करणे शक्य नसल्याचे सांगितले. नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके प्रकाशित करताना बदल केले जाऊ शकतात. त्यापूर्वी या शासन निर्णयाबाबत अभ्यास मंडळाच्या सदस्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बालभारतीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.

Today’s Horoscope 17 November 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.