Aundh News : बालदिनानिमित्त औंध येथे बालदिन मेळावा

एमपीसी न्यूज – भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त (14 नोव्हेंबर) बालदिन साजर केला जातो. बालदिनानिमित्त पुण्याचे माजी महापौर दत्ता गायकवाड यांनी औंध येथे बालदिन मेळावा आयोजित केला होता. गोळवलकर गुरुजी प्राथमिक शाळा, औंध येथे सायंकाळी 5 ते 8 यावेळेत हा मेळावा पार पडला.

यावेळी औंधच्या माजी नगरसेविका संगिता गायकवाड, बबनराव कुंभार, कलापुरे, औंध गावचे ग्रामस्थ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सततच्या बंधनामुळे घरात अडकून पडलेल्या बाळ गोपाळांना मुक्त खेळता यावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात लहानग्यांनी मिकी माऊस, घसरगुंडी, घोडे, घोडागाडी, जपिंग अशा विविध खेळांचा मनमुराद आनंद लुटला. जवळपास एक हजार बाळ गोपाळांनी या मेळाव्यात सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.