Balewadi : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राज्यस्तरीय युवक मेळावा संपन्न

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज (Balewadi )बालेवाडी क्रिडा संकूल येथे राज्यस्तरीय युवक मेळावा संपन्न झाला.

युवा नेते पार्थ पवार, आमदार सुनील शेळके, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युवक मेळाव्यानिमित्त मेळाव्याच्या पूर्वी दुचाकी रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली.

Alandi : गीता भक्ती अमृत महोत्सवानिमित्त इंद्रायणी घाटावर ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषासह मृदुंगाचा नाद

उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आणि मान्यवरांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.