Alandi : गीता भक्ती अमृत महोत्सवानिमित्त इंद्रायणी घाटावर ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषासह मृदुंगाचा नाद

एमपीसी न्यूज : गीता भक्ती अमृत महोत्सव सोहळ्याच्या 7 व्या दिवशी देवाच्या (Alandi) आळंदीने “लोकांचा महासागर” पाहिला. इंद्रायणी घाटातून ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘संजीवन समाधी’ भोवती केलेल्या ‘नगर प्रदक्षिणेत’ हजारो भाविक सहभागी झाले होते.

पुंडरिक गोस्वामी महाराज, स्वामी मित्रानंदजी, परमपूज्य महंत परमानंद महाराज, स्वामी विद्यानंद महाराज, आचार्य बाळकृष्ण, शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती महाराज, साध्वी भगवती सरस्वती, अभयदास महाराज यांचेही आशीर्वाद आज मेळाव्याला लाभले. देशाच्या प्रगतीसाठी आणि कल्याणासाठी विविध क्षेत्रांत आपले दृढ समर्पण आणि योगदान देणार्‍या अनेक विशेष व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला.

महोत्सवाविषयी बोलताना परमपूज्य स्वामी श्री गोविन्ददेव गिरीजी महाराज म्हणाले, “गीताभक्ती अमृत महोत्सव विविध स्तरातील भक्तांना एकत्र आणणारा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा एक भव्य सोहळा ठरला आहे. आळंदी नगर प्रदक्षिणेत सर्व भाविकांचे परमात्म्याप्रती समर्पण दिसले. पुण्याच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाकाव्य रामायणावर केलेले महानाट्य, प्रतिभा आणि भक्तीचे विलक्षण प्रदर्शन होते.”

‘नगर प्रदक्षिणा’ दरम्यान भक्त पारंपारिक पोशाखात त्यांच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करताना दिसले. एक रंग, एक आवाज आणि एक भावना यात सारे विलीन झाले. स्वामी श्री गोविन्ददेव गिरीजी महाराज यांनी झांजा आणि “ज्ञानबा तुकाराम” च्या गजरात भक्तांचे नेतृत्व (Alandi)केले. भक्तीमध्ये लीन स्वामीजींनी काही संत व शिष्यांसह “फुगडी” या सांस्कृतिक खेळातही भाग घेतला.

Pune : वारजे माळवाडी ग्रामस्थ रहिवासी मित्र मंडळाच्या वतीने बाबा खान यांना आदरांजली

त्यानंतर “राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी” च्या गायनाने श्रीमद्भागवत कथेला सुरुवात झाली. कथेच्या वेळी स्वामी राजेंद्रदास महाराजांनी “राम, कृष्ण, नारायण, हे परमेश्वर आहेत, हेच ज्ञान आहेत” असे प्रतिपादन केले. हे विधान सूचित करते की राम, कृष्ण आणि नारायण हे परमात्म्याची सर्वोच्च अभिव्यक्ती आहेत, अध्यात्माचे अंतिम ध्येय आहेत.

इंद्रायणी घाटावर 1,000 विद्यार्थ्यांचे मंत्रमुग्ध करणारे मृदंग वादन जमलेल्या साऱ्यांसाठी एक मेजवानीच ठरली. मृदंगनादानंतर, घाटातून घुमणाऱ्या भगवद्गीतेच्या श्लोकांच्या दिव्य पठणाने, उपस्थित विद्यार्थी, गीता परिवाराचे सदस्य आणि इतर भक्तांसह 10,000 लोकांना निसर्गाशी एकरुप असल्याची अनुभूती झाली.

गीता भक्ती अमृत महोत्सवाविषयी 

वेद व्यास प्रतिष्ठान आणि गीता परिवार यांनी आयोजित केलेला गीता भक्ती अमृत महोत्सव हा अध्यात्म, भक्ती, समृद्ध भारतीय संस्कृती आणि देशभक्ती यांचा अद्वितीय संगम आहे. या कार्यक्रमात 2000 हून अधिक वैदिक आचार्यांकडून एक दिव्य, अभूतपूर्व भव्य 81 कुंडीय महायज्ञ केला जात आहे. त्याचबरोबर भागवत कथा, हरिकीर्तन, दैवी पवित्र ग्रंथांचे अखंड पठण ऐकायला मिळेल. 450 हून अधिक कलाकार रामायण आणि भारतीय संत परंपरांवरील महानाट्य सादर करतील. आपला दैवी वैदिक वारसा, समृद्ध भारतीय संस्कृती आणि भक्ती साजरी करण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.