Pune : वारजे माळवाडी ग्रामस्थ रहिवासी मित्र मंडळाच्या वतीने बाबा खान यांना आदरांजली

एमपीसी न्यूज – वारजे ग्रामस्थ, वारजे ग्रामपंचायत सदस्य, (Pune) वारजेच्या विकासातील प्रत्येक आंदोलन, मोर्चा यामध्ये सक्रिय सहभाग असणारे जावेद ऊर्फ बाबा खान यांचे अल्पशा आजाराने 1 फेब्रुवारी रोजी निधन झाले. बाबा खान हे वारजेतील सर्वपक्षीय, सर्व धर्मीयांना परिचित आणि हवे हवे अशी वाटणारे सर्व मान्य नेतृत्व होते. वारजे कृती समितीचे ते एक प्रमुख समन्वयक होते. वारजे परिसरातील त्यांच्या कार्याचा ऊहापोह या सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी केला.

AAP : नवनियुक्त जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची नियुक्ती रद्द करा; आपची मागणी

या प्रसंगी बाबा खान यांच्या कुटुंबीयांसोबत सुगंधाचार्य हभप दिलीपभाऊ बराटे, संतसेवक हभप कैलासभाऊ देवकर, माजी जि. प. सदस्य प्रभाकर भोरकडे, कामगार नेते यशवंत ठोकळ, आखील वारजे माळवाडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष माणिकशेठ दुधाने, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, माजी नगरसेवक किरण बारटक्के, माजी स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट, संजय भोर, काँग्रेसचे युवा नेते दत्ता झंजे, मराठवाडा (Pune) सेवा संघाचे अध्यक्ष निळकंठ शेळके, भाजपाचे सुभाष शेठ अग्रवाल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत बराटे, मारुती मोहिते, एस कुमार टेलर, संजय कालेकर, अमित सोंडकर, गायकवाड सर, संभाजी ब्रिगेडचे राकेश सावंत,  ज्ञानेश्वर गोरे, पत्रकार राजीव पाटील, महादेव पवार, प्रदीप बलाढे, माऊली म्हेत्रे आदि प्रमुख उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.