AAP : नवनियुक्त जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची नियुक्ती रद्द करा; आपची मागणी

एमपीसी न्यूज – पुण्याचे नवनियुक्त (AAP) जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची नियुक्ती रद्द करा, अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी सुहास दिवसे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. पण, दिवसे यांच्या नियुक्तीवर आम आदमी पक्षाने हरकत घेतली असून त्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Pimpri : छत्रपती, अर्जुन, क्रीडा पुरस्कारर्थीना महापालिकेकडून मोठ्या मदतीची अपेक्षा- मुरलीकांत पेटकर

गेल्या चार वर्षांपासून दिवसे हे पुण्यात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या (AAP) पार्श्वभूमीवर बदल्यांसाठी जे नियम ठरवून दिले आहेत त्याचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे दिवसे यांची बदली रद्द करावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. दिवसे यांच्या बदली बरोबर इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीवर देखील आक्षेप घेण्यात आला आहे. या विरोधात देखील निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.