Pimpri : छत्रपती, अर्जुन, क्रीडा पुरस्कारर्थीना महापालिकेकडून मोठ्या मदतीची अपेक्षा- मुरलीकांत पेटकर

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड (Pimpri) शहरातील पद्मपुरस्कार, छत्रपती, अर्जुन अथवा क्रीडा पुरस्कारर्थीना महापालिकेकडून मोठ्या मदतीची अपेक्षा असल्याचे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुरलीकांत पेटकर यांनी म्हटले आहे.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने “माझे शहर माझा अभिमान” या कार्यक्रमाचे आयोजन आज शनिवार कासारवाडी, येथे करण्यात आला होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार उमा खापरे, कामगार नेते यशवंत भोसले, उद्योजक संतोष बारणे, बाळासाहेब ढसाळ, गोविंद वाकडे, नाना कांबळे उपस्थित होते.

पेटकर म्हणाले, अपंगांना ज्या पद्धतीने पेंशन आहे त्या पद्धतीने क्रीडा (Pimpri) पुरस्कारर्थीना पेंशन योजना सुरू करावी. कोरोना काळापासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा मिळकतकर वाढवलेला नाही. आजही दिल्लीला बोर्डावर माझ्या नावाखाली पिंपरी चिंचवड लिहिलेले आहे.

आमदार खापरे म्हणाल्याकी, राज्याच्या अनेक भागात मी फीरले आहे परंतु पिंपरी चिंचवड सारखा विकास कोठेही दिसला नाही. या शहरातील रस्ते , उड्डाणपूल, मेट्रो, वैद्यकीय तसेच शैक्षणिक सुविधा अभिमान वाटावा अशाच आहे.

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीची सोशल मीडियावरील व्हायरल वेळापत्रक खरे की खोटे?

यावेळी परीषदेचे स्वागताध्यक्ष कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात माझ्या आजपर्यंतच्या काळात पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाने घेतलेल्या “माझे शहर माझा अभिमान” या उपक्रमा सारखा स्तुत्य उपक्रम मी पाहिला नाही.

यावेळी बोलताना उद्योजक संतोष बारणे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराचा हा विकास पाहता या शहराला अजूनही खूप मोठे भवितव्य आहे. यावेळी अभय भोर, अजिज शेख आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब ढसाळ होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण शिर्के यांनी केले. सुत्रसंचालन माधुरी कोराड यांनी केले तर आभारप्रदर्शन विशाल जाधव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.