Baner News : बाणेर कोविड रुग्णालयाला मुदतवाढ

एमपीसी न्यूज – सध्या शहरात असलेला कोरोनाचा प्रादूर्भाव आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने बाणेर-बालेवाडीत उभारलेले डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल चालविण्यासाठी डॉक्टर भिसे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल या संस्थेला तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माध्यमांशी बोलताना रासने म्हणाले, ‘बाणेर-बालेवाडीत महापालिकेने उभारलेल्या कोविड हॉस्पिटलला या वर्षी एक जूनला मान्यता देण्यात आली होती. भिडे हॉस्पिटलबरोबरचा हा करारनामा आठ सप्टेंबर रोजी संपुष्टात आला. परंतु, सध्या असलेला कोरोनाचा प्रादूर्भाव आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता निविदा प्रक्रियेस विलंब होऊ शकतो. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होण्याची भीती आहे. या सर्व बाबींचा विचार करून सध्या कार्यरत असलेल्या भिडे हॉस्पिटलला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.