Baramati: बारामती येथे 2 मार्च रोजी भव्य ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन

एमपीसी न्यूज – कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता (Baramati)विभागाच्यावतीने 2 मार्च रोजी सकाळी 10वाजता विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती येथे ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात 100 पेक्षा अधिक नामांकित उद्योजकांनी सहभाग(Baramati) दर्शविलेला असून, त्यांच्याकडून 17 हजार पेक्षा जास्त रिक्तपदे अधिसूचित करण्यात आली आहेत. ही सर्व रिक्त पदे 10 वी, 12 वी, ड्राइव्हर, पदवीधर, एमएस्सी, बी. कॉम., डिएमई, बीबीए, एमबीए, एम. फार्म, कोणत्याही शाखेचा आटीआय, डिप्लोमा, ट्रेनी इंजिनिअर अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून पुणे विभागातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

 

Dighi : लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा; दोन महिलांची सुटका

नोकरी इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांबाबत अधिक माहितीसाठी विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीस (वॉक-इन-इंटरव्यूव) येताना सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज (रिज्यूम) व आधारकार्डाच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.
जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, 471रास्ता पेठ, सरदार मुदलीयार मार्ग, पुणे-11 येथे प्रत्यक्ष अथवा 020-26133606 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे म्हणाले, या मेळाव्याच्या माध्यमातून अधिकाधिक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. त्यासाठी उत्पादन, सेवा, आदरातिथ्य, औषधनिर्मिता, कृषी आदी अनेक क्षेत्रातील औद्योगिक आस्थापनांशी संपर्क साधण्यात येत आहे.
त्याद्वारे दहावी, बारावीपासून ते विविध व्यावसायिक क्षेत्रातील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत. जिल्ह्यातील युवकांनी या संधीचा लाभ घेण्याचे यानिमित्ताने मी आवाहन करतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.