Nigdi : लघुशंका केली म्हणून ज्येष्ठास मारहाण 

एमपीसी न्यूज – उघड्यावर लघुशंका केली म्हणून 55 वर्षीय ज्येष्ठ नागरिकास लोखंडी रॉडने मारहाम करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 30) दुपारी दोनच्या सुमारास ओटास्कीम येथे घडली.

कासीम इमाम शेख (वय 55, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अरबाज फहीम खान (रा. ओटास्कीमम निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हे उघड्यावर लघुशंका करत होते. यावेळी खान याने त्यांना विचारणा केली. यावेळी माझी तब्बेत बरी नाही, असे कारण शेख यांनी सांगितले. मात्र खान याने शेख यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली व रस्त्यावर पडलेल्या लोखंडी रॉडने डोक्‍यात मारले. यामध्ये शेख यांच्या डोक्‍याला दुखापत झाली आहे. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.