Pune : लिफ्ट देण्यास नकार दिल्याने मारहाण करून मोबाईल नेले हिसकावून

एमपीसी न्यूज  – लिफ्ट दिली नाही म्हणून मारहाण करून  दोन मोबाईल हिसकावून नेल्याची घटना काल मंगळवारी (दि. 30) पहाटे 4 च्या दरम्यान कर्वे रोड वरील एसएनडीटी कॉलेजवळ केन वर्ल्ड दुकानासमोर घडली.

याप्रकरणी रमेश साखरे (वय 44, रा. मांजरी-बुद्रूक) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश हे त्यांची कार एसएनडीटी कॉलेजवळ केन वर्ल्ड दुकानासमोर रोडच्या बाजूला पार्क करून थांबले होते. त्यावेळी त्यांच्याजवळ एक अनोळखी व्यक्ती आला आणि त्याने रमेश यांना लिफ्ट मागितली. रमेश यांनी त्या अनोळखी व्यक्तीस लिफ्ट देण्यास नकार
दिला. तेव्हा त्या व्यक्तीने रमेश यांना मारहाण करून त्यांच्याजवळील दोन मोबाईल हिसकावून पळून गेला.

याप्रकरणी अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अलंकार पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.