Musical event: ‘ हिंदोळा.. स्वर,शब्दांचा ‘ कार्यक्रमाचे आयोजन

भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाऊंडेशनतर्फ सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

एमपीसी न्यूज: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत मृदुला मोघे  प्रस्तुत ‘ हिंदोळा..स्वर, शब्दांचा ‘ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. (Musical Event) या कार्यक्रमात बंदिश, नाट्यगीते, अभंग, हिंदी-मराठी नाट्य गीते यांचे सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे.

या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमात मृदुला मोघे यांच्यासह संतोष कुलकर्णी, अमित जोशी, अभिजित नांदगावकर, प्राची घोटकर सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम शनिवार, 9 जुलै रोजी 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.
 हा कार्यक्रम विनामूल्य आहे. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा 128 वा कार्यक्रम आहे. (Musical Event) भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.