Pune News : भारतीय विद्या भवनमध्ये 19 नोव्हेंबर रोजी ‘पाऊसवेळा’ कार्यक्रम

एमपीसी न्यूज : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ पाऊसवेळा ‘ या पाऊसविषयक कविता,गायन आणि (Pune News) अभिवाचनाच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे करण्यात आले आहे.

Alandi News : माऊली दर्शनाकरिता भक्तीसोपन पूलावरील व शेजारील दर्शनबारी भाविकांनी पूर्णपणे भरली

अनुराधा जोशी निर्मित या कार्यक्रमाचे संशोधन,संहितालेखन डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी केले आहे. संगीतसंयोजन ,साथ संगत अनुप कुलथे यांची आहे.(Pune News) केतकी देशपांडे गायन करणार आहेत तर गौरी देशपांडे,दीपाली दातार अभिवाचन करणार आहेत. काव्य वाचन, गायन, अभिवाचन असा संगीतमय कार्यक्रम असणार आहे.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.‘

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.