Alandi News : माऊली दर्शनाकरिता भक्तीसोपन पूलावरील व शेजारील दर्शनबारी भाविकांनी पूर्णपणे भरली

एमपीसी न्यूज – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज 726 वा संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रे निमित्त महाराष्ट्रातून अनेक भाविक आळंदीमध्ये दाखल होत आहेत.कार्तिकी यात्रे निमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना दिसून येत आहे. (Alandi News) माऊली दर्शनासाठी दि.18 रोजी सकाळीच 10 च्या सुमारास  भक्तीसोपन पूलावरील व  नदीपलीकडील कमानी मध्ये असलेली दर्शनबारी पूर्णपणे भरलेली दिसून येत होती.

इंद्रायणी नदी पात्रात अनेक भाविक स्नान करताना दिसत होते. शहरात वारकरी भाविकांसाठी विविध साहित्य वस्तू असणाऱ्या दुकानांमध्ये त्या वस्तू घेण्यासाठी त्यांची गर्दी दिसून येत आहे. या महिन्यात थंडीचे दिवस असल्याने व पुढील दोन तीन महिने थंडीचे वातावरण कायमस्वरूपी राहील याचा अंदाज घेत थंडी पासून संरक्षण करणारे उबदार कपडे (स्वेटर इ.) विकत घेत असताना नागरिक दुकानांमध्ये दिसत होते.

Pune News : इंटेरियर करून न देता तीन लाखांची फसवणूक

कार्तिकी यात्रेमध्ये स्वच्छता जनजागृती साठी एका शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांद्वारे स्वच्छता अभियान रॅली काढण्यात आली होती.शहरात विविध ठिकाणी वारकरी भाविकांसाठी माऊली भक्त अन्नदान करत होते.सप्ताह पारायणातील वारकरी भाविकांसाठी त्यांच्या अन्न व्यवस्थेची व्यवस्था बहुत करून महिला वर्ग करत होत्या.नदीपलीकडील दर्शनबारी मंडपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.