Bhimashankar Land Slide: भीमाशंकर रस्त्याजवळील दरड हटवली

रस्ता वाहतुकीसाठी खुला

मपीसी न्यूज: भीमाशंकर रस्त्याजवळील पोखरी घाटातील दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आज सकाळी याठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली.(Bhimashankar Land Slide) गेला एक आठवडा भीमाशंकर व आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे पोखरी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली.

 

याबाबत घोडेगाव पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागास कळवले होते. त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून ढिगारा बाजूला करून एकेरी वाहतूक सुरु केली आहे. दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व दरड हटवून पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे.

गेल्या काही दिवसापासून भीमाशंकर व आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे नदी, ओढे, नाले तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी धबधबे ही वाहू लागले आहेत. (Bhimashankar Land Slide) हा नयनरम्य निसर्ग पाहण्यासाठी  पुणे, पिंपरी चिंचवड तसेच शेजारील ठाणे, नाशिक, अहमदनगर व इतर जिल्ह्यातूनही पर्यटक मोठ्या संख्येने  भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी तसेच पर्यटनासाठी येतात. प्रशासनाने भाविकांना व पर्यटकांना वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.