Indoree News : कुंडमळा येथे पाण्यात बुडणाऱ्या युवकाला वन्यजीव रक्षकांकडून जीवनदान

एमपीसी न्यूज – कुंडमळा येथे पाण्यात बुडणाऱ्या युवकाला वन्यजीव रक्षक टीमच्या (Indoree News) सदस्यांकडून जीवनदान देण्यात आले आहे. रविवारी ( दि. 10 ) संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन टीमने ही कौतुकास्पद कामगिरी केली.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की,  कुंडमाळा येथे रविवारमुळे पर्यटकांची खूप गर्दी होती. त्यामुळे या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी संस्थेची आपत्ती व्यवस्थापन टीम तैनात होती. याचवेळी एक व्यक्ती नदीपात्रात पडून वाहून जाऊ लागला. त्यावेळी या ठिकाणी कर्तव्यदक्ष असलेली वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या रेस्क्यू टीमने क्षणाचाही विलंब न लावता नदीपात्रात उतरून बुडालेल्या व्यक्तीस पाण्याबाहेर काढले.

 

Pimpri Corona Update: शहरात आज 71 नवीन रुग्णांची नोंद; 119 जणांना डिस्चार्ज

 

 

बुडालेल्या व्यक्तीच्या नाका – तोंडामध्ये पाणी गेल्यामुळे व्यक्ती मृत पावली की काय असे वाटत होते. असे असताना संस्थेतील आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेल्या सदस्यांनी परिस्थितीवर मात करत त्या व्यक्तीस सीपीआर देऊन तात्काळ प्राथमिक उपचार केले व जीवनदान दिले. हा सर्व प्रकार नदीपात्राच्या मधोमध घडला. बोटीच्या साहाय्याने (Indoree News) त्याला बाहेर काढण्यात आले. कारण पाण्याचा प्रवाह इतका होता, की त्या व्यक्तीला वाचवणे अशक्य होते. असे असताना देखील आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आणि सर्व सदस्यांचे टीमचे नियोजन या जोरावर या युवकाला वाचवण्यास टीमला यश आले असून त्याला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.  ही कामगिरी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे, अनिल आंद्रे, गणेश निसाळ, विनय सावंत, निनाद काकडे, विलास गायकवाड, श्रेयस कांबळे, विश्वजीत भोहीटे, भास्कर माळी यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.