Bhosari : संतोष कुरवत गोळीबार प्रकरणातील संशयित राहुल विश्वकर्मा अखेर जेरबंद

एमपीसी न्यूज – संतोष कुरवत गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी राहुल विश्वकर्माला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी काल रात्री बाराच्या कोयत्यासह अटक केली.
 

पोलिसांना मिळालेल्या बातमीनुसार, सापळा रचून एमआयडीसी पोलिसांनी गुलाब पुष्प उद्यानाजवळ विश्वकर्मा याला अटक केली. यावेळी त्याच्याकडून 200 रुपये व कोयता जप्त करण्यात आला आहे. देहूरोड, चिंचवड, पिंपरी, पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गुन्हेगारी कारवाया केल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर काल त्याला बेड्या ठोकण्यात भोसरी पोलिसांना यश आले. त्याने अनेक वेळा पोलिसांच्या अंगावर हत्यार उगारून पळ काढला होता. तसेच देहूरोड परिसरात त्याची मोठी दहशद होती विश्वकर्मा याच्याकडून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
 
त्या अनुशंगाने पोलिसांचा तपास सुरू असून विश्वकर्मा याच्यावर बेकायदेशीररित्या हत्यार बाळगण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रनिल चौगुले व इतर कर्मचारी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्याला एक धारदार कोयत्या सह जेरबंद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.