Bhosari : विवाहितेच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – माहेराहून चार लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा वारंवार शारिरीक आणि मानसिक छळ करून महिला झोपेत असताना तिच्या अंगावर ज्वलनशिल पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

ही घटना भोसरीतील इंद्रायणीनगर येथे नुकतीच घडली. याप्रकरणी सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महिलेने गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तो झिरो नंबरने भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

पती अशोक लक्ष्मण धवडे, सासू हिराबाई लक्ष्मण धवडे, सासरा लक्ष्मण आसाराव धवडे, मावस दिर पप्पु नारायण धवडे, एकनाथ लक्ष्मण धवडे, उषाबाई एकनाथ धवडे, शांताबाई दगडू वापसे (सर्व रा. भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहेराहून चार लाख रूपये घेऊन येण्यासाठी विवाहितेवर आरोपी दबाव टाकत होते. विवाहितेने आत्ताच माझ्या वडिलांनी चार लाख रूपये दिले आहेत, असे म्हटल्याने चिडलेल्या आरोपींनी तिला शिवीगाळ करत मारहाण केली.

शारिरीक, मानसिक छळ केला. तसेच फिर्यादी या झोपेत असताना त्यांच्या अंगावर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून देवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.