Bhosari : भेटण्यासाठी बोलवून तिघांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : भेटण्यासाठी बोलावून चार जणांनी तिघांना (Bhosari) कोयत्याने मारहाण केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.27) रात्री भोसरी येथे घडली.

याप्रकरणी प्रकाश सुभाष शर्मा (वय 32 रा.मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी सुभाष शुभ मंगल शर्मा (वय 72) विश्वास शिंदे (वय 22) दिनेश गायकवाड (वय 22) व एक अज्ञात इसम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Dighi : भारतमातानगर दिघी ते भोसरी-आळंदी रस्त्याला मुहूर्त; प्रलंबित रस्त्याचा प्रश्न अखेर निकालात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष याने फिर्यादी यांना भेटण्यासाठी बोलवले. यावेळी फिर्यादी त्यांचे मित्र बिमला शर्मा (Bhosari) वय 50 व प्रदीप शर्मा वय 41 यांच्यासह आरोपीला भेटण्यासाठी गेले. तिथे गेले असता आरोपीने त्याच्या इतर साथीदारांसह संगणमत करून फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ केली.

तसेच हातातील कोयत्याने लोखंडे वाढणे फिर्यादी व त्यांच्या मित्रांना मारहाण करत जखमी केले. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.