Bhosari Crime News : सेट्रिंग मटेरियल परत न करता 35 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – भाडे तत्वावर घेतलेलं सेट्रिंग मटेरियल करार संपल्यावर देखील परत न करता 35 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 16 मार्च 2020 ते 26 फेब्रुवारी 2021 या कालावधीत भोसरी एमआयडीसी याठिकाणी ही घटना घडली.

याप्रकरणी स्टिल व्यावसायिक दीपक चतु:र्भुज भतेजा (वय 48, रा. भोसरी एमआयडीसी) यांनी शुक्रवारी (दि. 26) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नरेश विराहा अंबाडा (वय 35, रा. दौंड, पुणे) यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्याकडून 20 लाख रुपयांचे सेट्रिंग मटेरियल भाडे तत्वावर घेतले. त्यासंबंधीचा करार संपला असतानाही सेट्रिंग मटेरियल परत न करता भाड्याचे 15 लाख रुपये देखील दिले नाहीत.

आरोपीने अशी एकूण 35 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डेरे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.