Bhosari Crime News : घटस्फोटाची धमकी देत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – माहेरून पैसे आण म्हणत  विवाहितेला सतत ( Bhosari Crime News ) घटस्फोटाची धमकी देणाऱ्या पती व त्याच्या कुटुंबीयावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार चिखली येथे  मे 2016 पासून सुरु होता.

याप्रकरणी पीडितेने भोसरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.18) फिर्याद दिली असून पोलिसांनी पती सलमान खालीक मुदावर (वय 33), सुलतान खालीक मुजावर (वय 50), खालीक रहमान मुजावर (वय 60) सदाम खालीक  मुजावर (वय 30) व महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade News : लोहगडावर महाशिवरात्र उत्साहात साजरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना लग्न झाल्यापासून आरोपी हे त्रास देत होते. माहेरून पैसे घोऊन ये म्हणून मारहाण व शिवीगाळ करत होते. महिला आरोपीने घरगुती कामावरून मानसिक त्रास दिला. पैशाचे कारण करत किंवा चारित्र्यावर संशय घेत आरोपी पती हा पीडितेला सतत घटस्फोटाची ( Bhosari Crime News ) धमकी देत होता. यावरून पिडीतेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून भोसरी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.