Bhosari crime News : लहान मुलांच्या भांडणावरून भोसरीत तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून एका तरुणाचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी देवकर वस्ती, भोसरी येथे घडली.

राजेश शंकर पवार (वय 27, रा. देवकर वस्ती, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गायकवाड आणि त्याची आई (पूर्ण नाव माहिती नाही) अशी संशयित आरोपींची नावे असून सध्या ते पळून गेले आहेत.

भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास लहान मुलांची भांडणे झाली. त्या भांडणामध्ये मोठ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

_MPC_DIR_MPU_II

त्यावेळी तरुणांमध्येही भांडणे झाली. त्यावेळी आरोपी गायकवाड आणि त्याच्या आईने राजेश पवार यास ढकलून दिले. त्यामुळे तो बेशुद्ध झाला.

राजेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेनंतर आरोपी गायकवाड आणि त्याची आई हे दोघे पळून गेले आहेत.

आरोपी आणि मयत हे दौंड तालुक्यातील आहेत. ते नंदीबैलवाल्याचे काम करतात. सध्या ते भोसरीतील देवकर वस्ती येथे पाल टाकून राहत आहेत.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.