Maharashtra Corona Update : राज्यात 84,607 सक्रिय रुग्ण, आज 4,132 नव्या रुग्णांची वाढ

एमपीसी न्यूज – राज्यात आज 4 हजार 132 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर बरे झालेल्या नवीन 4 हजार 543 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या 84 हजार 082 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 17 लाख 40 हजार 461 एवढी झाली आहे. त्यापैकी एकूण 16 लाख 09 हजार 607 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

राज्यात एकूण 84 हजार 082 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.48 टक्के झाले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे.

राज्यात आज 125 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 45 हजार 809 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.63 टक्के एवढा आहे.

राज्यात आतापर्यंत 97 लाख 22 हजार 961 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 17 लाख 40 हजार 461 नमूणे सकारात्मक आले आहेत. सध्या राज्यात 8 लाख 10 हजार 267 जण होम क्वारंटाईन आहेत तर 6 हजार 177 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

येत्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने वर्तवली आहे. त्यासंदर्भात प्रत्येक जिल्हा आणि महापालिका प्रशासनाला खबरदारी म्हणून संभाव्य लाटेची पूर्वतयारी करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.

‘सध्या राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असली तर युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आहे. युरोपियन देशांच्या उदाहरणावरुन भारतात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता आहे,’ असं आरोग्य सेवा संचालनालयाने म्हटलं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.