Bhosari Crime News : भोसरीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – भोसरी येथील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून भोसरी पोलिसांनी 1.44 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.12) साडेपाचच्या सुमारास जय मल्हार गॅरेजशेजारी, भोसरी येथे ही कारवाई करण्यात आली.

अंगद आनंतराव राऊत (वय 44, रा. मारूंजी गाव, मुळशी), गणेश भिकु जाधव (वय 45, रा. पांडवनगर, भोसरी), मंगेश सखाराम अंभोरे (वय 30, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), संतोषकुमार भोलानाथ जयस्वाल (वय 42, रा. धावडे वस्ती), प्रविण मनोहर चव्हाण ( रा. चाकण) व दगडू पांडुरंग केदारी (रा. खराबवाडी, चाकण) यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

राजेंद्र भानुदास राठोड ( पोलीस हवालदार, भोसरी पोलीस ठाणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी जुगार चालवित होते. कारवाईत पोलिसांनी त्यांच्याजवळील 1 लाख 44 हजार 245 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस हवालदार बोयणे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1