Bhosari Crime News : तडीपार केलेला आरोपी शहरात वास्तव्य करताना आढळला; पोलिसांनी केली अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला आरोपी शासनाची कोणतीही परवानगी न घेता शहरात वास्तव्य करताना आढळला. त्यामुळे त्याला अटक करून त्याच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

स्वप्निल उर्फ सपन्या सुरेश भोई (वय 19, रा. शंकर काची चाळ वॉर्ड नबर 03, दापोडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई सागर जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच शहरातील 13 सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्यात भोसरी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हेगारांचा समावेश होता.

आरोपी स्वप्नील आणि संतोष माने अशी त्यांची नावे आहेत. तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच आरोपी स्वप्नील पिंपरी-चिंचवड शहरात शासनाची कोणतीही परवानगी न घेता वास्तव्य करताना पोलिसांना आढळला. त्यावरून त्याला अटक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.