Bhosari Crime News: अंगावरील दागिने कमरेच्या पिशवीत ठेवायला लावून चोरटयांनी दागिन्यांची पिशवी पळवली

एमपीसी न्यूज – अंगावरील दागिने कमरेच्या पिशवीत ठेवण्यास सांगून दोन चोरट्यांनी वृद्ध महिलेचे एक लाख ९५ हजार 180 रुपयांचे दागिने फसवून नेले. ही घटना बुधवारी (दि. 4) सकाळी अकरा वाजता लांडेवाडी भोसरी येथे घडली.

सिंधुबाई शांताराम बोराडे (वय 65, रा. मोशी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एक व्यक्ती गरिबांना कोरोना काळात साडी, चप्पल व बांगड्या दानधर्म करत असल्याचे सांगून आरोपींनी फिर्यादी वृद्ध महिला बोराडे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर बोराडे यांना त्यांच्या अंगावरील दागिने त्यांच्या कमरेच्या पिशवीत ठेवण्यास भाग पाडले.

बोराडे यांनी त्यांच्या अंगावरील एक लाख 95 हजार 180 रुपयांचे दागिने कमरेच्या पिशवीत ठेवले. त्यानंतर आरोपींनी हातचलाखी करून बोराडे यांची कमरेची कापडी पिशवी चोरून नेली.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.