Bhosari : डायनोर्क कंपनी कामगारांच्या वतीने अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज- भोसरी येथील डायनोर्क कंपनीच्या वतीने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. देशाचे थोर सुपुत्र, निसर्गप्रेमी,व दूरदृष्टी लोकनेता आपल्या लोकशाहीत नसल्याची खंत व्यवस्थापकीय संचालक, किशोर राऊत यांनी व्यक्त केली.

एकशे पंचवीस कोटी जनतेच्या मनावर अधिराज्य करणारा लोकमान्य नेता, राष्ट्रवादावर “अटल” निष्ठा असणारा प्रखर देशभक्त आपल्यात नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते व कामगार अण्णा जोगदंड यांनी व्यक्त केली.

राजकारणातील भीष्माचार्य हरपला, राष्टसूर्याला आपला देश मुकला अशा शब्दात मनुष्यबळ विकास अधिकारी सूर्यकांत मुळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

यापुढे सर्वांनी देशहितासाठी ,सामाजिक कामासाठी आपला वेळ द्यावा असे आवाहन विभाग प्रमुख हेमंत नेमाडे यांनी केले. यावेळी प्रमोद पाटील, रवी भेंनकी, अण्णा जोशी, मोहन कृष्णन, स्वप्नील देशपांडे, सचिन नेमाडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.