Bhosari : नगरसेविका प्रियंका बारसे यांच्यामुळे दिव्यांगांना मिळाला पेन्शन योजनेचा लाभ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडून नुकतीच दिव्यांग योजना पात्र धारकांची नावे ऑनलाईन जाहीर करण्यात आली.

प्रभाग क्रमांक पाचमधील 27 दिव्यांगाचे अर्ज नगरसेविका प्रियंका बारसे यांच्या संपर्क कार्यालयातून भरण्यात आले होते. यापैकी वीस जणांना ही पेन्शन योजना लागू झाली. यावेळी एकमेकांना पेढा भरुन आनंद साजरा केला.

संजय ब्राह्मणकर, ज्ञानेश्वर कंधारे या अस्थिव्यंग दिव्यांगानी आपल्या भावना व्यक्त करीत धन्यवाद मानले. तर सविता लाल, रुपाली कदम या बधिरमुक दिव्यांगानी हावभावाने- कृतीतून त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.